English Proverbs-Idioms with Marathi Meaning

0
0
Share:
English Proverbs-Idioms with Marathi Meaning

A Proverb is a short, well-known pithy saying that states a general truth or piece of advice based on common sense or experience. It is a complete sentence that teaches a moral lesson.

An Idiom is a group of words established by usage as having a meaning not deducible from those of the individual words. In other words, you cannot understand an idiom by looking at the dictionary meanings of the separate words.


Examples:

A bad workman blames his tools: नाचता येईना अंगण वाकडे.
A barking dog seldom bites: गरजेल तो पडेल काय?
A bird in the hand is worth two in the bush: हातातली गोष्ट झाडावरच्या दोन गोष्टींपेक्षा चांगली.
A book is like a garden carried in the pocket: पुस्तक म्हणजे खिशात बाळगलेली बाग आहे.
A constant guest is never welcome: सतत येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत होत नाही.
A friend in need is a friend indeed: संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र.
A friend to all is a friend to none: जो सर्वांचा मित्र असतो, तो कोणाचाच नसतो.
A guilty conscience needs no accuser: चोराच्या मनात चांदणे.
A house is not a home: वीटा-मातीच्या घराला घरपण नसते (माणसांशिवाय घर हे घर वाटत नाही).
A man is known by the company he keeps: संगतीवरून माणसाची ओळख पटते.
A penny saved is a penny earned: केलेली बचत ही एका अर्थाने कमाईच असते.
A picture is worth a thousand words: एका चित्रातून हजार शब्दांचा आशय स्पष्ट होतो.
A rolling stone gathers no moss: सतत फिरणाऱ्या दगडाला शेवाळ लागत नाही.
A room without books is like a body without a soul: पुस्तकांशिवाय खोली म्हणजे आत्म्याशिवाय शरीर होय.
A small leak will sink a great ship: लहान छिद्र मोठ्या जहाजाला बुडवू शकते (छोट्या चुकीने मोठे नुकसान होते).
A stitch in time saves nine: वेळीच केलेली सावधगिरी मोठी हानी टाळते.
Absence makes the heart grow fonder: दूर गेल्यावर ओढ वाढते.
Action speaks louder than words: उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ.
All that glitters is not gold: चकाकते ते सर्व सोने नसते.
All things are difficult before they are easy: कोणतीही गोष्ट सोपी होण्यापूर्वी कठीण असते.
All’s well that ends well: ज्याचा शेवट गोड, ते सर्वच गोड.
Ambition knows no bounds: महत्त्वाकांक्षेला सीमा नसते.
An apple a day keeps the doctor away: दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही.
An empty mind is the devil’s workshop: रिकामे मन हे सैतानाचे घर.
An investment in knowledge pays the best interest: ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक सर्वोत्तम परतावा देते.
Apparel oft proclaims the man: वेशभूषेवरून माणसाची पारख होते.
As you sow, so shall you reap: करावे तसे भरावे (पेरावे तसे उगवते).
Ask no questions, hear no lies: प्रश्न विचारू नका, म्हणजे खोटं ऐकावं लागणार नाही.
Barking dogs seldom bite: भुंकणारे कुत्रे चावत नाहीत.
Beauty is in the eye of the beholder: सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
Beauty is only skin deep: बाह्य रूप गौण असते.
Beauty lies in the eye of the beholder: सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते.
Beggars can’t be choosers: गरजू लोक निवडीचा अधिकार ठेवू शकत नाहीत.
Better a live coward than a dead hero: मरण्यापेक्षा पळून जाऊन जीव वाचवलेला बरा.
Better an open enemy than a false friend: खोट्या मित्रापेक्षा उघड शत्रू बरा.
Better late than never: कधीच न होण्यापेक्षा उशिरा झालेले चांगले.
Better safe than sorry: पश्चाताप करण्यापेक्षा सावध राहिलेले चांगले.
Better to wear out than to rust out: रिकामे बसून राहण्यापेक्षा कामात व्यस्त राहणे चांगले.
Birds of a feather flock together: समान विचारांचे लोक एकत्र येतात.
Blood is thicker than water: रक्ताचे नाते इतर नात्यांपेक्षा घट्ट असते.
Broken friendship may be soldered, but will never be sound: तुटलेली मैत्री जोडता येते, पण तिला पूर्वीसारखा घट्टपणा राहत नाही.
Charity begins at home: दातृत्वाची सुरुवात स्वतःच्या घरापासून होते.
Cleanliness is next to godliness: स्वच्छता ही ईश्वराच्या जवळ असते.
Comparisons are odious: तुलना करणे नेहमीच क्लेशकारक असते.
Constant dripping wears away the stone: सातत्य असेल तर कठीण कामही साध्य होते.
Cowards die many times before their death: भित्रे लोक मरण्यापूर्वी अनेक वेळा मरतात.
Curiosity killed the cat: अति उत्सुकता संकटात टाकू शकते.
Cut your coat according to your cloth: अंथरूण पाहून पाय पसरावे.
Diligence is the mother of good luck: मेहनत हीच नशिबाची जननी आहे.
Diligent work pays off: मेहनतीचे फळ नेहमी गोड असते.

Distance lends enchantment to the view: लांबून डोंगर साजरे.

Don’t bite off more than you can chew: झेपेल तेवढेच काम हाती घ्यावे.

Don’t count your chickens before they hatch: अंडी उबवण्याआधी पिल्लांची गणती करू नका.

Don’t cross the bridge until you come to it: संकट येण्यापूर्वी काळजी करू नका.

Don’t cry over spilled milk: होऊन गेलेल्या गोष्टीवर शोक करू नका.

Don’t judge a book by its cover: बाह्यरूपावरून एखाद्याचा अंदाज लावू नका.

Don’t kill the goose that lays the golden eggs: फायद्याचा मूळ स्त्रोत नष्ट करू नका.

Don’t put all your eggs in one basket: सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका (सर्व जोखीम एकाच ठिकाणी घेऊ नका).

Drops make an ocean: थेंबे थेंबे तळे साचे.

East or West, Home is the best: कोठेही जा, आपले घर हेच सर्वोत्तम.

Easy come, easy go: सहज आलेले सहज जाते.

Easy come, easy go: हरामाचा माल हलालात जातो.

Empty vessels make more noise: उथळ पाण्याला खळखळाट फार.

Every cloud has a silver lining: प्रत्येक वाईट परिस्थितीत काही चांगले असते.

Every dog has its day: प्रत्येकाला त्याचे दिवस येतात (कधी ना कधी नशीब चमकते).

Every house has its skeleton: घरोघरी मातीच्या चुली.

Every man is the architect of his own fortune: प्रत्येक माणूस आपल्या नशिबाचा शिल्पकार असतो.

Every tide hath its ebb: चढ त्या ठिकाणी उतार असतोच.

Example is better than precept: उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ.

Experience is the best teacher: अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु होय.
Experience is the mother of wisdom: अनुभव हा शहाणपणाची जननी आहे.

Face is the index of mind: चेहरा मनाचा आरसा असतो.

Failure is the stepping stone to success: अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

Familiarity breeds contempt: अति परिचयात अवज्ञा.

Fine feathers make fine birds: देखण्या पोशाखाने माणूस देखणा दिसतो.

First impression is the last impression: पहिली छाप हीच शेवटची छाप असते.

Forbidden fruit is sweet: निषिद्ध गोष्ट नेहमी मोहक वाटते.

Forgive and forget: क्षमा करा आणि विसरून जा.

Fortune favors the bold: नशीब धाडसी माणसाला साथ देते.

Fortune favors the brave: नशीब धाडसी लोकांना साथ देते.

Friendship is a plant of slow growth: मैत्री हे सावकाश वाढणारे रोप आहे.

Genius is one percent inspiration and ninety-nine percent perspiration: बुद्धिमत्ता १% प्रेरणा आणि ९९% मेहनत असते.

God helps those who help themselves: जे स्वतःला मदत करतात, त्यांनाच देव मदत करतो.

Good mind, good find: आप भला तो जग भला.

Good things come to those who wait: धीर धरणाऱ्याला चांगले फळ मिळते.

Grasp all, lose all: अति तिथे माती.

Great hopes make great men: मोठ्या आशा माणसाला मोठे बनवतात.

Great minds think alike: मोठ्या विचारवंतांचे विचार सारखेच असतात. 

Great oaks from little acorns grow: लहान सुरुवात मोठे रूप घेते.

Grief divided is made lighter: दुःख वाटून घेतल्याने हलके होते.

Haste makes waste: उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग (घाईने काम बिघडते).

Haste makes waste: घाई कामात बिघाड करते.

He who digs a pit for others, falls into it himself: दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा त्यात स्वतःच पडतो.

He who plays the piper calls the tune: जो पैसे खर्च करतो त्याचाच शब्द चालतो.

Health is wealth: आरोग्य हीच खरी संपत्ती.

Honesty is the best policy: प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे.

Honour your word: दिलेला शब्द पाळावा.

Hope for the best, prepare for the worst: चांगल्याची आशा धरा पण वाईटासाठी तयार राहा.

Hunger is the best sauce: भुकेल्याला कोंडा आणि निजेला धोंडा (भूक लागली की साधे अन्नही चविष्ट लागते).

Ignorance is bliss: अज्ञान हे कधी कधी सुखकारक असते.

Ill got, ill spent: वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच जाते.

It is never too late to mend: सुधारणेला कधीही उशीर झालेला नसतो.

It takes two to make a quarrel: एका हाताने टाळी वाजत नाही.

It’s an ill wind that blows nobody good: अशी आपत्ती क्वचितच असते जिचा कोणालाच फायदा होत नाही.

Keep your chin up: हिम्मत हारू नका.

Knowledge is a treasure: ज्ञान ही एक संपत्ती आहे.

Knowledge is no burden: ज्ञान हे कधीही ओझे वाटत नाही.
Knowledge is power: ज्ञान हेच सामर्थ्य.

Learning is a lifelong process: शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे.

Leave no stone unturned: प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.

Lend your money and lose your friend: पैसे उसने द्या आणि मित्र गमवा.

Let bygones be bygones: होऊन गेलेले विसरून जा.

Let the sleeping dogs lie: उकरून काढलेली भांडणे टाळावीत.

Life is not a bed of roses: जीवन म्हणजे फुलांची शय्या नाही.

Life is what you make it: तुमचे जीवन तुमच्या विचारांवर अवलंबून असते.

Like father, like son: खान तशी माती (बापासारखा मुलगा).

Like master, like man: यथा राजा तथा प्रजा.

Little strokes fell great oaks: लहान प्रयत्नांनी मोठी कामे पूर्ण होतात.

Look at the bright side: नेहमी सकारात्मक बाजू पहा.

Look at the bright side: सकारात्मक बाजू पहा.

Look before you leap: उडी मारण्यापूर्वी विचार करा.

Love is blind: प्रेम आंधळे असते.

Make hay while the sun shines: वाहत्या गंगेत हात धुवून घेणे.

Make hay while the sun shines: संधी मिळेल तेव्हा फायदा घ्यावा.

Man proposes, God disposes: मनुष्य योजतो एक आणि देव घडवतो दुसरे.

Man proposes, God disposes: मनुष्य योजतो, देव घडवतो.

Many a mickle makes a muckle: थेंबे थेंबे तळे साचे.

Many hands make light work: अनेकांच्या मदतीने कठीण काम सोपे होते.

Might is right: बळी तो कान पिळी.

Misery loves company: दुःखी माणसाला सोबतीची गरज असते.

Mistakes are the portals of discovery: चुका या शोधाची द्वारे असतात.

Money doesn’t grow on trees: पैसे झाडाला लागत नाहीत.

Money is a good servant but a bad master: पैसा चांगला गुलाम आहे पण वाईट मालक.

Money makes the mare go: दाम करी काम.

Necessity is the mother of invention: गरज ही शोधाची जननी आहे.

Necessity is the mother of invention: गरज ही शोधाची जननी आहे.

Necessity knows no law: भुकेल्याला कोंडा आणि निजेला धोंडा.

Necessity knows no law: भुकेल्याला कोंडा आणि निजेला धोंडा.

Never put off until tomorrow what you can do today: आजचे काम उद्यावर ढकलू नका.

No man is an island: माणूस एकटा राहू शकत नाही (माणूस समाजप्रिय प्राणी आहे).

No pain, no gain: कष्टाशिवाय फळ नाही.

No sweat, no sweet: कष्टाशिवाय फळ मिळत नाही.

Nothing succeeds like success: यशासारखे दुसरे यश नाही.

Old friends and old wine are best: जुने मित्र आणि जुनी दारू सर्वोत्तम असते.
Old habits die hard: जुन्या सवयी लवकर सुटत नाहीत.

Old is gold: जुने ते सोने.

One man’s meat is another man’s poison: एकासाठी जे चांगले असते ते दुसऱ्यासाठी वाईट असू शकते.

One swallow does not make a summer: एका फुलाने हार बनत नाही (एका गोष्टीवरून निष्कर्ष काढू नका).

Opportunities knock but once: संधी एकदाच दार ठोठावते.

Opportunity seldom knocks twice: संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही.

Out of sight, out of mind: दृष्टीआड तर सृष्टीआड.

Out of sight, out of mind: दृष्टीआड तर सृष्टीआड.

Out of the frying pan into the fire: आगीतून फुफाट्यात.

Out of the frying pan into the fire: आगीतून फुफाट्यात.

Patience is a virtue: संयम हा एक सद्गुण आहे.

Penny wise, pound foolish: छोट्या खर्चात काटकसर, पण मोठ्या खर्चात उधळपट्टी.

Penny wise, pound foolish: पै-पैची काटकसर आणि रुपयाची उधळपट्टी.

Perseverance is the key to success: चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे.

Poverty is no sin: गरिबी हा काही गुन्हा नाही.

Practice makes perfect: सरावाने माणूस परिपूर्ण होतो.

Practice what you preach: आधी केले मग सांगितले.

Prevention is better than cure: उपचारापेक्षा प्रतिबंध बरा.

Prevention is better than cure: रोगापेक्षा प्रतिबंध चांगला.

Pride has a fall: गर्वाचे घर खाली.

Prosperity gains friends, adversity tries them: संपत्ती मित्र मिळवून देते, पण संकट त्यांची परीक्षा घेते.

Prosperity makes friends, adversity tries them: भरभराटीत मित्र मिळतात, पण संकटात त्यांची परीक्षा होते.

Punctuality is the soul of business: वक्तशीरपणा हा व्यवसायाचा आत्मा आहे.

Riches have wings: लक्ष्मी चंचल असते.

Rome was not built in a day: मोठी कामे तडकाफडकी होत नाहीत.

Safety lies in the middle course: सुवर्णमध्य साधणे नेहमी सुरक्षित असते.

Self-help is the best help: स्वावलंबन हीच सर्वोत्तम मदत आहे.

Service to man is service to God: जनसेवा हीच ईश्वर सेवा.

Short reckonings make long friends: व्यवहारात स्पष्टता असेल तर मैत्री टिकते.

Silence gives consent: मौन हे संमतीचे लक्षण आहे.

Silence is golden: शांतता मौल्यवान आहे. 

Slow and steady wins the race: सावकाश पण सातत्य असल्यास विजय निश्चित होतो.

Slow and steady wins the race: सावकाश पण सातत्य असल्यास विजय होतो.

Small beginnings lead to great things: लहान सुरुवातीचे रूपांतर मोठ्या गोष्टीत होते.

Smooth seas do not make skillful sailors: कठीण काळ माणसाला कणखर बनवतो.

Speech is silver, silence is golden: बोलण्यापेक्षा मौन अधिक प्रभावी असते.

Still waters run deep: संथ पाणी खोल असते.
Still waters run deep: संथ पाणी खोल असते.

Strike while the iron is hot: लोखंड तापले असताना घाव घाला.

Success is a journey, not a destination: यश हा एक प्रवास आहे, अंतिम मुक्काम नाही.

Tell me who your friends are, and I’ll tell you who you are: तुझे मित्र कोण आहेत ते सांग, मी तू कोण आहेस ते सांगेन.

The best things in life are free: जीवनातील सर्वोत्तम गोष्टी विनामूल्य असतात.

The customer is always right: ग्राहक नेहमी बरोबर असतो.

The early bird catches the worm: जो लवकर उठतो तो यशस्वी होतो.

The end justifies the means: साध्य साध्य करण्यासाठी साधन कसेही असले तरी चालते.

The grass is always greener on the other side: लांबून डोंगर हिरवे दिसतात.

The pen is mightier than the sword: लेखणी तलवारीपेक्षा श्रेष्ठ आहे.

The proof of the pudding is in the eating: प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कशाचीही पारख होत नाही.

The roots of education are bitter, but the fruit is sweet: शिक्षणाची मुळे कडू असतात, पण फळ गोड असते.

The squeaky wheel gets the grease: जो आवाज उठवतो त्यालाच मदत मिळते.

The sun shines on all alike: निसर्ग सर्वांशी समान वागतो.

The wearer knows where the shoe pinches: ज्याची जळते त्यालाच कळते.

There is no accounting for tastes: आवडीनिवडीला काही मर्यादा नसते.

There is no smoke without fire: विस्तविल्याशिवाय धूर निघत नाही.

Think big, act small: विचार मोठा ठेवा पण सुरुवात लहान गोष्टींपासून करा.

Time and tide wait for no man: वेळ आणि संधी कोणासाठी थांबत नाहीत.

Time is money: वेळ मौल्यवान आहे.

Tit for tat: जशास तसे.

To err is human: चुका करणे हा मानवी स्वभाव आहे.

Too many cooks spoil the broth: पाच पन्नास आचारी वरनामध्ये मीठ भारी.

Too many cooks spoil the broth: पाच पन्नास आचारी, वरणामध्ये मीठ भारी.

True blue never stains: खरे सोने कधीही काळवंडत नाही.

True friendship is a rare gem: खरी मैत्री हे एक दुर्मिळ रत्न आहे.

Two heads are better than one: दोन डोकी एकापेक्षा श्रेष्ठ (एकट्यापेक्षा दोघांचा विचार चांगला). 

Two is company, three is none: दोघांची सोबत चांगली, तिसरा असला की बिघडते.

Unity is strength: एकी हेच बळ.

Variety is the spice of life: वैविध्य हे जीवनाचे सौंदर्य आहे.

Virtue is its own reward: सद्गुण हे स्वतःच एक फळ आहे.

Wait and see: पहा आणि वाट पहा. 

Walls have ears: भिंतींना कान असतात.

Well begun is half done: चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.

Well begun is half done: चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण होण्यासारखे आहे.

What’s done cannot be undone: होऊन गेलेली गोष्ट बदलता येत नाही.

When in Rome, do as the Romans do: जिथे जावे तिथे तिथल्या लोकांप्रमाणे वागावे.
When the cat’s away, the mice will play: मालक नसेल की नोकर मनमानी करतात.

Where there is a will, there is a way: इच्छा तिथे मार्ग.

Where there is a will, there is a way: इच्छा तिथे मार्ग.

Wisdom is better than riches: शहाणपण हे श्रीमंतीपेक्षा श्रेष्ठ आहे.

Wise men learn by other men’s mistakes: शहाणा माणूस दुसऱ्याच्या चुकांवरून शिकतो.

Work is worship: सेवा (काम) हीच ईश्वर सेवा.

You can’t have your cake and eat it too: एकाच वेळी दोन विरुद्ध गोष्टी साध्य करता येत नाहीत.

Youth is wasted on the young: तारुण्याचे महत्त्व तारुण्यात समजत नाही.

Share:

Leave a reply